पद्माक्षी रेणुका

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

पद्माक्षी रेणुका

पद्माक्षी रेणुका देवीला नारायणी,भवानी,शताक्षी,रौद्री,गौरी,रक्तकालिका किंवा पद्मांबिका असे तिचे काही मूळ नावं .देवीची नाव जरी वेगळी असली तरी ही सर्व या परांबिका आदिशक्तीला

संबोधित करतात.श्रीदेवी पद्माक्षी या स्थानी रक्तकाली स्वरूपात इथे वसली आहे जे देवी ललिता आणि काली या देवीचा एकत्रित रूप आहे, तिला पूर्ण षोडशी असे ही म्हणले जाते. हे मंदिर अद्याप विकसित झालेले नाही. हे कावाडे गावात अलिबागमधील अत्यंत पूजनीय मंदिर आहे. पद्माक्षी रेणुका 51 किंवा 108 शक्तीपीठांपैकी एक असल्याचे म्हणले जाते, त्यापैकी हे भगवती भवानी शक्तीपीठ आहे जे आद्यभवानी पीठ किंवा अक्षरा पीठ म्हणून ओळखले जाते.परंतु महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठात याचा समावेश होत नाही. ही वामशत्की(सिंह) या प्राण्यावर आरूढ झालेली आहे.तिचे विलक्षण सौंदर्य आणि कृपा कथांमध्ये उल्लेखित आहे शिवाय, तिला जोगेश्वरी नावाची एक बहीण देखील आहे. देवी पद्माक्षी भगवतीला शताक्षी, पद्माकोषा ,माऊली, काली, भैरवी, वज्रेश्वरी, अंबा आणि एकवीरा म्हणूनही ओळखली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →