पद्मश्री वॉरियर ह्या एनआयओ यूएसचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, तसेच त्या त्यांच्या संचालक मंडळाच्या सदस्यही आहेत. एनआयओ ही अमेरिकेतील एक विद्युत वाहन कंपनी आहे. त्या कॅलिफोर्नियातील सान होजे शहरामध्ये राहतात. जेथे एनआयओचे मुख्यालय आहे. वॉरियर ह्या सिस्को सिस्टम्सच्या माजी प्रमुख टेक्नॉलॉजी आणि स्ट्रॅटजी ऑफिसर (सीटीओ) होत्या, आणि मोटोरोला इंकच्या पूर्व सीटीओ आहेत. फोर्ब्स मासिकानुसार त्या २०१४ साली जगातील ७१ वी सर्वात शक्तिशाली महिला म्हणून नोंद करण्यात आली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पद्मश्री वॉरियर
थोडक्यात पण महत्त्वाचे.