पदव्युत्तर पदविका किंवा पदवी (PGDip, PgDip, PG Dip., PGD, PgD, PDE) हे एक पदव्युत्तर शिक्षण असून ते विद्यापीठाची पदवी झाल्यानंतर देण्यात येते. ती ग्रॅज्युएट पदविका नंतर ही दिली जाऊ शकते. पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम देणाऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, बार्बाडोस, बेल्जियम, ब्राझील, कॅनडा, चिली, जर्मनी, हॉंगकॉंग, जमैका, स्पेन, दक्षिण अमेरिका, भारत, आयर्लंड, नेदरलँड्स, न्यू झीलंड, नायजेरिया, फिलिपिन्स, पोर्तुगाल, रशिया, श्रीलंका, पाकिस्तान, पोलंड, सौदी अरेबिया, सिंगापूर, स्वीडन, युनायटेड किंग्डम, आणि त्रिनिनाद आणि टोबॅगो या देशांचा समावेश होतो.
पदव्युत्तर पदविका आणि पदव्युत्तर पदवी हे दोन्ही पदव्युत्तर शिक्षण आहेत.ते उच्च शिक्षण नाहीत कारण पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू समजल्या जातात.
पदव्युत्तर शिक्षण म्हणजे उच्च शिक्षणानंतर घेतले जाणाऱ्या शिक्षणालाच पदव्युत्तर शिक्षण असे म्हणतात.
पदवी शिक्षण (Undergraduate) असते तर पदव्युत्तर शिक्षण (Postgraduate) असते.
पदव्युत्तर पदविका.(Postgraduate Diploma) हे पदवी आणि पदव्युत्तर पदवी यांच्यातील दुवा असते. तसेच पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम पदव्युत्तर पदवी समान असते पण पदवी समान नसते. मास्टर पदवी आणि पदविका हे दोन्ही पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रम आहेत.
पदव्युत्तर पदवी ही पदवी नंतर दोन वर्षांचा अभ्यासक्रम असतो.
जर पदवीधर विद्यार्थ्यांना दोन वर्षांची पदव्युत्तर पदवी
(Postgraduate Degree) करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसेल तर त्यांना पदव्युत्तर पदविका (Postgraduate Diploma) एक वर्षांचा कालावधी अभ्यासक्रम पूर्ण करता येते.
पदव्युत्तर पदविका म्हणजे पदवी नंतर आणि पदव्युत्तर पदवीच्या मध्ये एक वर्ष कालावधीचे जे पदव्युत्तर शिक्षण घेतले जाते त्यालाच पदव्युत्तर पदविका म्हणले जाते.
पदवी.(Undergraduate) अभ्यासक्रम ४ वर्षांचा असतो.
पदव्युत्तर पदवी.(Postgraduate Degree) अभ्यासक्रम २ वर्षांचा असतो.
पदव्युत्तर पदविका. (Postgraduate Diploma.) अभ्यासक्रम १ वर्षांचा असतो.
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश पात्रताधारक पदवीधर विद्यार्थी हा संबंधित विद्याशाखेत पदवीधारक असावा लागतो. किंवा पदव्युत्तर विद्यार्थी हा संबंधित विद्याशाखेतून पदव्युत्तर पदविकाधारक असावा लागतो.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० , नुसार शिक्षणाचे टप्पे :-
पहिला टप्पा पुर्व प्राथमिक दुसरा टप्पा प्राथमिक तिसरा टप्पा पुर्व माध्यमिक चौथा टप्पा माध्यमिक पाचवा टप्पा उच्च माध्यमिक सहावा टप्पा उच्च शिक्षण सातवा टप्पा पदव्युत्तर शिक्षण आठवा टप्पा सर्वोच्च शिक्षण. (डॉक्टरेट) असे शिक्षणाचे एकूण ८ टप्पे करण्यात आले आहेत.
पदव्युत्तर पदविका
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.