पंजाब मेल

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

१२१३७/१२१३८ पंजाब मेल ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी पंजाब मेल मुंबई ते पंजाबच्या फिरोजपूर दरम्यान दररोज धावते. मुंबई ते फिरोजपुर ती १२१३७ या क्रमांकाने धावते तर १२१३८ या क्रमांकाने विरुद्ध दिशेला धावते. ही मुंबई ते फिरोझपूर दरम्यान रोज धावणाऱ्या दोन गाड्यांपैकी एक आहे, तर दुसरी फिरोजपुर जनता एक्सप्रेस आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते फिरोझपूर रेल्वे स्थानकांदरम्यानचे १९३२ किमी अंतर पंजाब मेल ३४ तासांत पूर्ण करते.

ही गाडी पहिल्यांदा १ जून, १९१२ रोजी मुंबईच्या बॅलार्ड पिअर मोल स्थानकातून सध्या पाकिस्तानात असलेल्या पेशावरकडे जायची. २,४९६ किलोमीटरचा दीर्घ पल्ला असलेली त्या काळची ती पहिली आणि सर्वात जलद गाडी होती. हे अंतर पार करण्यास तिला ४७ तास लागत. सुरुवातीला ही गाडी रोज सुटत नसे; टपाल नेण्याच्या दिवशीच ही प्रवासाला निघे. गाडीला तीन डबे होते आणि त्यांत एकूण ९६ उतारू सामावले जात. दि पंजाब लिमिटेड हे या गाडीचे सुरुवातीचे नाव होते. जेव्हा ही गाडी मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनसवरून सुटू लागली, तेव्हा हिचे नाव पंजाब मेल झाले.

पंजाब मेलला पॅंट्री कार धरून २३ डबे आहेत. ही गाडी आता मुंबई छ.शि.ट.वरून सुटून भारताच्या पंजाब प्रांतातील फिरोझपूर कॅंटॉनमेन्ट रेल्वे स्थानक या स्टेशनापर्यंत धावते. या गाडीचा नंबर १२१३७/१२१३८ असा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →