पंचमढी (हिंदीत पचमढी) हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील नर्मदापुरम जिल्ह्यातील एक पर्वतावरील थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणाहूनच गुप्त महादेव, छोटा महादेव, नागद्वार या स्थळांस जाता येते. हे ठिकाण सातपुडा पर्वतश्रेणीतील असून पूर्वी इंग्रजांची येथे छावणी होती.
पंचमढी हे समुद्रसपाटीपासून १,०६७ मीटर उंचीवर आहे. येथे घनदाट जंगल, खळखळाट करणारे जलप्रपात आणि तलाव आहेत. येथील जंगलात सिंह, बिबट्या, चितळ, सांबर, गवा, चिंकारा, अस्वल, रानरेडा असे अनेक जंगली प्राणी आहेत. येथील एक गुंफा ही पुरातत्त्वदृष्ट्या महत्त्वाची आहे, तिच्यात शैलचित्र मिळाले आहे.
पंचमढी
यामागील विज्ञान आणि इतिहास.