पंकज त्रिपाठी

या विषयातील रहस्ये उलगडा.

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी (२८ सप्टेंबर, १९७६ - ) हा हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय करणारा भारतीय अभिनेता आहे. त्याने २००४ मध्ये रन आणि ओंकारामध्ये छोट्या भूमिकेसह पदार्पण केले. त्यानंतर त्याने शेकडो चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. त्रिपाठीला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक फिल्मफेर पुरस्कार, एक स्क्रीन पुरस्कार आणि आयफा पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

त्रिपाठीने फुक्रे (२०१३), मसान (२०१५), निल बट्टे सन्नाटा (२०१६), बरेली की बर्फी (२०१७), न्यूटन (२०१७), फुक्रे रिटर्न्स (२०१७), स्त्री (२०१८), लुडो (२०२०) आणि मिमी (२०२१) यांसह अनेक चित्रपटांमधून समीक्षकांची वाखाणणी मिळवली आहे. न्यूटनसाठी, त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले.

मिर्झापूर, क्रिमिनल जस्टिस, युअर्स ट्रुली आणि क्रिमिनल जस्टिस: बिहाइंड क्लोस्ड डोअर्स या वेब सिरीजमधील त्यांच्या गाजलेल्या भूमिकांसह त्यांनी वेब जगतातही त्याला प्रसिद्धी मिळाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →