डॉ. नरसिंह महादेव जोशी (११ जानेवारी, इ.स. १९३६:गारवडे, महाराष्ट्र - ) हे एक मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक आहेत. बालसाहित्य व शिक्षणक्षेत्राविषयक सखोल चिंतन हे न.म. जोशी यांचे वैशिष्ट्य आहे.
जोशी हे मूळचे पाटण तालुक्यातील गारवडे या सातारा जिल्ह्यातील छोट्या दुर्गम गावाचे आहेत. जोशी यांची लहानपणाची पहिली पाच वर्षे या गावात गेली. जोशींचे आजोबा वामन नारायण जोशी हे आनंद संगीत मंडळीत गायक-नट होते. वडील महादेव वामन जोशी हे शाहूनगरवासी नाटक मंडळीत व्यवस्थापक होते. ही कंपनी बंद पडल्यावर ते पुण्याला आले आणि आचाऱ्याचा व्यवसाय करू लागले. न.म. जोशींच्या आईचे नाव अन्नपूर्णा महादेव जोशी होते. त्यांनी न.म. जोशींना साताऱ्याला आणले व पहिलीत घातले. पुन्हा गारवड्याला येऊन त्यांचे दुसरीपासूनचे शिक्षण सुरू झाले. चौथीपर्यंत गावात शिकल्यावर ते पाचवी ते सातवी या वर्गांसाठी सोलापूरला आले, आठवीसाठी जळगावला, नववीसाठी सांगलीला आणि दहावीसाठी परत पुण्याला आले. काकांच्या बदल्यांमुळे त्यांचे शालेय शिक्षण अनेक ठिकाणी झाले. त्यांनी या काळात वर्तमानपत्रे टाकली.
न.म. जोशी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?