रामचंद्र गणेश कुंदगोळकर

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

रामचंद्र गणेश कुंदगोळकर

सवाई गंधर्व (१९ जानेवारी १८८६, २ सप्टेंबर १९५२) हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक हे गंधर्व परंपरेतील एक गायक होते. त्यांचे मूळ नाव रामभाऊ कुंदगोळकर (पूर्ण नाव : रामचंद्र गणेश कुंदगोळकर) होते.

रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला प्रारंभ केला. तेथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामभाऊ एका नाटक कंपनीत सामील झाले आणि थोड्याच काळात मराठी रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. नारायण श्रीपाद राजहंस यांना ज्याप्रमाणे लोक बालगंधर्व म्हणून ओळखू लागले, त्याचप्रमाणे रामभाऊ कुंदगोळकरांना लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले. त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे अजरामर झाली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →