तारा बेनोडिक्ट रिचर्ड्‌स वनारसे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

डॉ. तारा वनारसे अथवा तारा रिचर्ड्स (मे १२, इ.स. १९३० - मे १३, इ.स. २०१०) या प्रसूतितज्‍ज्ञ डॉक्टर आणि मराठी भाषेतल्या लेखिका होत्या. मूळच्या महाराष्ट्रातील पुण्याच्या असलेल्या डॉ. वनारसे, मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या. इ.स. १९७० ते इ.स. १९७५ या काळात त्यांनी पुण्यात प्रॅक्टिस केली. मात्र त्यानंतर त्या इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्या. त्यांचे वयाच्या ८० व्या वर्षी इंग्लंडमधील हेमेल हेम्पस्टेड येथे निधन झाले.

डॉ. बेनोडिक्ट रिचर्ड्‌स (मृत्यू इ.स. १९९५) हे त्यांचे पती आणि मिरांडा रिचर्ड्‌स ही त्यांची कन्या होत. तारा वनारसे मराठी नवकथेच्या सुरुवातीपासून साक्षीदार होत्या. त्यांनी लिहिलेले ’कक्षा’ हे नाटक मराठी नाटकाला नवे वळण देणारे ठरले. इंग्लंडमधील सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात त्या सक्रिय होत्या. लंडन येथील महाराष्ट्र मंडळासाठी त्यांनी बरेच काम केले आहे. त्यांच्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →