न्यूझ१८ मराठी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

न्यूझ१८ मराठी

न्यूझ १८ लोकमत ही बातम्यांच्या प्रसारणाला वाहिलेली मराठी भाषेतील आघाडीची निष्पक्ष वृत्तचित्रवाहिनी आहे. या वाहिनीचे प्रसारण ६ एप्रिल, इ.स. २००८ रोजी सुरू झाले. नेटवर्क १८ आणि लोकमत न्यूझ प्रायव्हेट लि. यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. वाहिनीचे मुख्यालय मुंबईतील लोअर परेल येथे आहे. सध्या प्रसाद काथे हे वृत्तवाहिनीचे संपादक आहे. तर महेश म्हात्रे हे या वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक आहेत.

२०११ सालातल्या सर्वांत जास्त वृत्तविषयक कार्यक्रमासाठीचे राष्ट्रीय, तसेच मटा सन्मान सारखे पुरस्कार न्यूझ १८ लोकमत (पूर्वीच्या आयबीएन-लोकमत) ने मिळवले आहेत. ज्या व्यक्ती व संस्था महाराष्ट्राच्या प्रगतीला कारणीभूत झाल्या त्यांचा परिचय करून देणाऱ्या न्यूझ १८ लोकमतच्या लघुपटमालिकेला, ‘गर्जा महाराष्ट्र’ ह्या महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सर्वांत जास्त बक्षिसे मिळाली.

वृत्तवाहिनी सुरू झाल्यापासून प्रत्येक वर्षी या वाहिनीने पुरस्कार मिळविले आहेत . बेधडक, शो टाईम, दिवसभराच्या बातम्या, खबर महाराष्ट्राची, सलाम महाराष्ट्र, गावाकडच्या बातम्या, वाचाल तर वाचाल, टेकताई, क्राईम टाईम, रिपोर्ताज या सारखे अनेक कार्यक्रम या वाहिनीवर मराठी जगतात पहिल्यादांच प्रसारित केले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →