न्यू झीलंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९७६ मध्ये तीन कसोटी सामने आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने २-० अशी जिंकली. आशिया खंडात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. अटीतटीच्या झालेला एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना न्यू झीलंडने एका धावेने जिंकला. यजमान पाकिस्तानचे नेतृत्व मुश्ताक मोहम्मद याने केले.
पुढे जाऊन एक प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू बनलेला पाकिस्तानचा जावेद मियांदाद याने या दौऱ्यात पहिल्या कसोटीद्वारे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७६-७७
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.