न्यू झीलंड क्रिकेट संघाने ११ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २००४ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. दौऱ्यावर २-कसोटी आणि ३-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. उभय संघातील एकदिवसीय मालिकेतील विजेत्याला ह्या मालिकेपासून चॅपेल-हॅडली चषक देण्यात येईल.
कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने २-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिका १-१ ने बरोबरीत सुटली. एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.
ह्याशिवाय दौऱ्यादरम्यान एक प्रथमश्रेणी सामना आणि एक मर्यादित षटकांचा सामनासुद्धा खेळवण्यात आला.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००४-०५
या विषयावर तज्ञ बना.