न्गुगी वा थिअंगो (५ जानेवारी, १९३८) हे पूर्व आफ्रिकेतील केन्या देशामधील लेखक आणि शिक्षणतज्ञ आहेत. त्यांचे मूळ नाव 'जेम्स थिअंगो न्गुगी' असे होते. त्यांनी कादंबरी, नाटक, लघुकथा, निबंध, बालवाङ्मय अशा विविध साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले आहे. आफ्रिकेतील विशेषतः केन्या या देशातील समाज आणि संस्कृती, भाषिक संपन्नता, वसाहतवाद, मानवीय विपन्नता, सामाजिक दंभ आणि अंधश्रद्धा हे विषय त्यांच्या साहित्यकृतींतून प्रामुख्याने अभिव्यक्त झाले आहेत. २०१६ साली साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी त्यांच्या नावाचे नामांकन प्रामुख्याने चर्चेत होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →न्गुगी वा थिअंगो
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.