नॉर्थ डकोटा (इंग्लिश: North Dakota) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर भागात कॅनडाच्या सीमेवर वसलेल्या ह्या राज्यामध्ये अत्यंत तुरळक लोकवस्ती आहे. नॉर्थ डकोटा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १९वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४८व्या क्रमांकाचे राज्य आहे.
नॉर्थ डकोटाच्या उत्तरेला कॅनडाचे सास्काचेवान व मॅनिटोबा हे प्रांत, पश्चिमेला मोंटाना, पूर्वेला मिनेसोटा तर दक्षिणेला साउथ डकोटा ही राज्ये आहेत. बिस्मार्क ही नॉर्थ डकोटाची राजधानी असून फार्गो हे सर्वात मोठे शहर आहे.
नॉर्थ डकोटा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.