नेट (परीक्षा)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

राष्ट्रीय पात्रता परीक्षा(नेट) ज्याला यूजीसी नेट(UGC-NET) किंवा एनटीए-यूजीसी-नेट(NTA-UGC-NET) म्हणून ओळखले जाते, ही भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि / किंवा कनिष्ठ संशोधन फेलोशिप (जेआरएफ) मिळवण्यासाठी पात्रता निश्चित करण्यासाठीची चाचणी आहे. यूजीसी नेट ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते आणि यशाचे प्रमाण केवळ ^% आहे. पूर्वी, उत्तीर्ण प्रमाण ३% - ४%च्या आसपास होते. खासगी महाविद्यालयातील साहाय्यक प्राध्यापक नेट पास असू शकतात किंवा नसू शकतात. परंतु विद्यापीठ आणि सरकारी महाविद्यालयांसाठी नेटची पात्रता अनिवार्य आहे. विद्यापीठे व शासकीय महाविद्यालयांमधील साहाय्यक प्राध्यापक ७व्या वेतन आयोगांतर्गत एचआरए, डीए आणि इतर भत्ते वगळता सुरुवातीलाच ₹ ५७,७०० पगाराला पात्र असतात., जे वार्षिक ही वेतनवाढीच्या ३%सह सर्वात जास्त पगार देणारी सरकारी नोकरी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, २१९ शहरांमधील ७०० केंद्रांवर ८१ विषयांचा समावेश असलेल्या नेटच्या परीक्षेसाठी डिसेंबर २०१९मध्ये एकूण १०,३४,८७२ उमेदवारांनी अर्ज केला होता.

जुलै २०१८पर्यंत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) नेट परीक्षा घेत होते. परंतु डिसेंबर २०१८पासून युनिव्हर्सिटी ग्रॅॅंट्स कमिशन ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा घेत आहे. भारत सरकारने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार ही परीक्षा जून महिन्यात आणि डिसेंबर महिन्यात अशी वर्षातून दोनदा घेण्यात येणार असून ती ऑफलाइन मोडऐवजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →