निळी मार्गिका (मुंबई मेट्रो)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

निळी मार्गिका (मुंबई मेट्रो)

मार्गिका १ ही मुंबई मेट्रो ह्या मुंबई शहरातील जलद परिवहन प्रणालीची एक मार्गिका आहे. ११.४ किमी लांबीची ही मार्गिका संपूर्णपणे उन्नत स्वरूपाची असून त्यावर एकूण १२ स्थानके आहेत. वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणारी मार्गिका १ मुंबईच्या पूर्व उपनगरांना पश्चिम उपनगरांसोबत जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. ₹४,३२१ कोटी इतका खर्च करून बांधण्यात आलेल्या ह्या मार्गिकेचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी करण्यात आले. आजच्या घडील रोज सुमारे २.३ लाख प्रवासी ह्या सेवेचा वापर करतात. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड ही ह्या मार्गिकेची चालक कंपनी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →