हा एक भाषांतर प्रकल्प आहे.
नियोजित-ऊर्जा-संक्रमण (जर्मन:Energiewende)या संकल्पनेचा अर्थ पारंपारिक ऊर्जा ऐवजी अपारंपारिक ऊर्जा वापर, तसेच अणुऊर्जेचा नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या रूपाने एक शाश्वत ऊर्जापुरवठा म्हणून वापर होय. ही ऊर्जा वापरातील बदलां बद्दलची संकल्पना व शब्दरचना जर्मनीत अधिकृतपणे वापरली गेली. हा जर्मन शब्द सर्वात पहिल्यांदा इ.स. १९८०च्या सुमारास प्रकाशित झालेल्या Öko-Insitut (उपयोजित पर्यावरणासाठीची संस्था)च्या पुस्तक, ज्याचे नाव आहे – Wachstum und Wohlstand ohne Erdöl und Uran (पेट्रोलियम आणि युरेनियम शिवाय वाढ आणि विस्तार) यात वापरला. पुढे हाच शब्द एक ऋृणशब्द म्हणून इतर भाषांमधे वापरला. (उदाहरणार्थ “The German Energiewende” किंवा “A Energiewende alema”).
नियोजित-ऊर्जा-संक्रमणाचे ध्येयः पारंपारिक ऊर्जा अर्थव्यवस्थेमुळे निर्माण झालेले पर्यावरण, समाज, आणि आरोग्य यासंबंधीच्या समस्या कमी करणे. तसेच या सर्वातून उत्पन्न झालेले, तरीपण ऊर्जा क्षेत्रात मूल्य भाव न झालेले, बाह्य खर्च पूर्णपणे अंतर्गत करणे. मानवनिर्मित जागतिक तापमान वाढीच्या दृष्टीकोनातून ऊर्जा क्षेत्राचे विकार्बनीकरण (किंवा कार्बनविरहीत अर्थव्यवस्था) हे आजच्या काळात विशेष महत्त्वाचे आहे. कार्बनविरहीत अर्थव्यवस्था हे खनिज ऊर्जा स्तोत्र, जसे की पेट्रोलियम, कोळसा आणि नैसर्गिक वायू, वापरणे बंद करून साध्य करता येते. तसेच मर्यादित खनिज ऊर्जा स्तोत्र आणि ऊर्जा स्तोत्रांचे धोके ह्या बाबी सुद्धा नियोजित-ऊर्जा-संक्रमणाला कारणीभूत ठरतात. जागतिक ऊर्जा समस्यांवर उपाय हे २१ व्या शतकातले महत्त्वाचे आव्हान झाले आहे
नियोजित-ऊर्जा-संक्रमणामधे विद्युत, उष्मा-ऊर्जा (युरोप सारख्या थंड प्रदेशात याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो) आणि दळणवळण या तीन क्षेत्रांचा, तसेच याशिवाय खनिज (किंवा जीवाश्म) कच्च्या मालापासून प्लास्टिक व खते उत्पादन बंद करणे याचाही समावेश होतो. नियोजित-ऊर्जा-संक्रमणाने पेट्रोलियम त्याग आणि कोळसा त्यागने म्हणजेच, निर्णायक ऊर्जा स्तोत्र योग्य प्रमाणात जमिनीखाली राहू देणे. अक्षय ऊर्जेच्या विकासा सोबतच ऊर्जा संग्रहांचा विस्तार, ऊर्जा कार्यक्षमतेमधे वाढ, तसेच ऊर्जेच्या खर्चाची बचत करण्याच्या उपायांची अंमलबजावणी हे या परिवर्तनाचे म्हणजेच नियोजित-ऊर्जा-संक्रमणाचे मूलभूत घटक आहेत. अक्षय ऊर्जेच्या अंतर्गत जैव ऊर्जा (बायो-एनर्जी), भूगर्भीय ऊर्जा, जल ऊर्जा, महासागर ऊर्जा, सौर ऊर्जा (सौर उष्णता, फोटोव्होल्टिक) आणि पवन ऊर्जा हे समाविष्ट होतात. वैचारिक दृष्टीने केंद्रीय ऊर्जा विभागास (मुख्यतः युरोपियन देशांमध्ये) यासाठी एक महत्त्वाची भूमिका दिली आहे, विशेषतः उष्मा-पंपांच्या मार्फत उष्मा-ऊर्जा क्षेत्राचे आणि विद्युतगमनशीलता मार्फत वाहतूकीचे विद्युतीकरण करणे.
पारंपारिक इंधना ऐवजी अक्षय ऊर्जेचा वापर करण्याच्या परिवर्तनाला अनेक देशांमधे सुरुवात झाली आहे. नियोजित-ऊर्जा-संक्रमणाची संकल्पना, तसेच त्यासाठी गरजेचे तंत्रज्ञान हे सुविख्यात आहे. तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण जगाचे नियोजित-ऊर्जा-संक्रमणाची अंमलबजावणी इ.स. २०३० पर्यंत व्यावहारिक मानले आहे. राजकीय व कार्यात्मक समस्येंमुळे ही अंमलबजावणी इ.स. २०५० पर्यंत शक्य होईल, याचे कारण म्हणजे सर्वात मोठा अडथळा समजला जाणारा राजकीय इच्छेचा अभाव हा होय. जागतिक पातळीवर तसेच जर्मनीत झालेल्या अभ्यासानुसार, पुनरुत्पादक ऊर्जा प्रणाली मधील ऊर्जेची किंमत ही पारंपारिक जिवाश्म किंवा अणुशक्ती ऊर्जा प्रणाली मधील ऊर्जेच्या किंमती एवढीच किंवा त्यापेक्षा कमी असते.
नियोजित-ऊर्जा-संक्रमणाचे पहिले अंमलबजावणी करणारे राष्ट्र डेन्मार्कने इ.स. २०१२ मधेच त्यांच्या वीज गरजेच्या ३० % पवन ऊर्जेतून प्राप्त केली होती. हे राष्ट्र डेन्मार्क तिन्ही क्षेत्रासाठी संपूर्ण पुनरुत्पादक ऊर्जा पुरवठा इ.स. २०५० पर्यंत लक्ष्य केले आहे. त्याचप्रमाणे जर्मनीचे नियोजित-ऊर्जा-संक्रमण महत्त्वाचे आहे, जगभर ज्याला मान्यता मिळाली व अनुकरणही केले, पण ते टीकेचे व नापसंतीचेही लक्ष्य झाले. जरी ते वारंवार व चुकीच्या दृष्टीकोनातून दुसऱ्या अणु ऊर्जा परित्याग २०११ (Nuclear Phase-out 2011) याच्याशी जोडले, तरी जर्मनीमधे नियोजित-ऊर्जा-संक्रमण हे इ.स. १९८० मधेच पुनरुत्पादक ऊर्जेच्या विस्तार व अणु ऊर्जा प्रकल्पाच्या पर्यायांच्या शोधासोबत सुरू झाले. पुनरुत्पादक ऊर्जेचा विस्ताराच्या, ऊर्जा कार्यक्षमतेची वृद्धीच्या, आणि ऊर्जेच्या संवर्धनाच्या मुलभूत गरजांचे विज्ञानात एकसंघपणा साधताना, निश्चित योजना मात्र राजकीय वादात होत्या. सार्वजनिक चर्चांमधे ही संकल्पना बऱ्याचवेळेस विद्युत क्षेत्रापुरती मर्यादित केली जाते, जे जर्मनीमधे एकूण वीज वापराच्या सुमारे फक्त २० % समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे राजकीय व सार्वजनिक चर्चांमधून हे लक्षात घेतले जात की नियोजित-ऊर्जा-संक्रमण यशस्वी करण्यासाठी पुनरुत्पादक ऊर्जेचा विस्ताराच्या, ऊर्जा कार्यक्षमतेची वृद्धीच्या सोबतच ऊर्जेचा पुरेसा पुरवठाच्या दृष्टीकोनातून वागण्यातील परिवर्तन तसेच मानसिक बदल, म्हणजेच ऊर्जा वापराच्या सवयीत बदल करून ऊर्जा संवर्धन करणे, याची गरज आहे.
नियोजित-ऊर्जा-संक्रमण
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?