निमाड हा पश्चिम-मध्य भारतातील मध्य प्रदेश राज्याचा नैऋत्य प्रदेश आहे. त्याच्या भौगोलिक सीमांमध्ये निमाडच्या उत्तरेला विंध्य पर्वत आणि दक्षिणेला सातपुडा पर्वत आहे, तर मध्यातून नर्मदा नदी वाहते. निमाडला पौराणिक काळात अनूप जनपद असे संबोधले जात असे. नंतर त्याचे नाव निमाड असे पडले. निमाड प्रदेश हा खांडव आणि भुआणा अशा दोन उपप्रदेशात विभागलेला आहे. प्राचीन काळापासूनच उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा प्रमुख महामार्ग निमाडातल्या सध्याच्या बऱ्हाणपूर जिल्ह्यातील असिरगड किल्ल्याच्या अधिपत्याखाली राहिलेला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →निमाड
यामागील विज्ञान आणि इतिहास.