निदा फाजली

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मुक्तबा हसन ऊर्फ निदा फाजली (जन्म : दिल्ली, भारत, १२ ऑक्टोबर, १९३८; - मुंबई, महाराष्ट्र, भारत, ८ फेब्रुवारी, २०१६) हे जनप्रिय शायर नजीर अकबराबादी, नजीर बनारसी यांची शायरी पुढे नेणारे एक उर्दू शायर होते. हिंदी चित्रपटांचे ते संवादलेखक आणि गीतकार होते.

त्यांचा जन्म दिल्लीत झाला आणि त्यांचे बालपण ग्वाल्हेर येथे गेले. हिंदुस्थानच्या फाळणीनंतर त्यांचे आई-वडील पाकिस्तानात गेले, निदा भारतात्च राहिले. साठोत्तरी उर्दू शायरीचे ते एक महत्त्वपूर्ण शायर म्हणून भारत व पाकिस्तानात ओळखले जात. त्यांचा पहिला काव्यसंग्रह लफ्जों का पूल लोकप्रिय झाला. ते आपल्या कविता, गीत आणि गझलांत नातेसंदर्भ, सत्य आणि असत्य इत्यादींचे विश्लेषण करतात. त्यात देशविभाजनामुळे विस्थापित झालेल्या व्यक्तिमत्त्वांचा संघर्ष, व्यक्तिगत दुःखे व तदनुषंगाने मनुष्याच्या स्वभावातील परिवर्तन हेसुद्धा दिसतात.

उत्कृष्ट गीतकारासाठी निदा फजली यांना फिल्मफेअर आणि झी सिनेचे नामांकन मिळाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →