रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे (१८४८-१८९७) हे भारतातील कामगार संघटना चळवळीचे जनक होते. १९व्या शतकात कापड गिरणीच्या कामगारांची परिस्थिती सुधारण्यासाठीच नव्हे तर जातीय आणि सांप्रदायिक मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या धाडसी पुढाकारासाठीही त्यांची आठवण ठेवली जाते. याशिवाय १८९५ मध्ये हिंदू-मुस्लिमांदरम्यान झालेल्या दंगलीत केलेल्या कामाबद्दल त्यांना राव बहादूर ही पदवीही देण्यात आली होती. तत्कालीन ब्रिटिश भारत सरकारने त्यांना "जस्टिस ऑफ पीस" हा सन्मान देऊन सन्मानित केले होते. भारत सरकारने २००५ मध्ये त्यांच्या छायाचित्रासह एक टपाल तिकीट जारी केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नारायण मेघाजी लोखंडे
या विषयावर तज्ञ बना.