नारायण मल्हार जोशी (जन्म : गोरेगांव-कुलाबा जिल्हा, ५ जून १८७९; - ३० मे १९५५) हे भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक होते. ते मराठी लेखक वामन मल्हार जोशी आणि संस्कृत पंडित महादेव मल्हार जोशी यांचे बंधू होते.
जोशी यांचे वडील वेदविद्यासंपन्न आणि प्रसिद्ध फलज्योतिषी होते. नारायणरावांचे गोरेगाव या जन्मगावीच वेदाध्ययन व प्राथमिक शिक्षण पार पडले. वडील भाऊ महादेवराव यांच्या आग्रहावरून ते सन १८९३मध्ये इंग्रजी शिक्षणाकरिता पुण्याला गेले. . न्यू इंग्लिश स्कूल मधून मॅट्रिक व १९०१ मध्ये डेक्कन कॉलेजातून बी. ए. उत्तीर्ण झाले. पदवी मिळविल्यानंतर जोशींनी सहा महिने अहमदनगर येथे दुष्काळपीडितांसाठी काढलेल्या सरकारी अन्नसत्रात काम केले. १९०१-१० या काळात अहमदनगर व पुणे येथे खाजगी शाळांमधून, तर मुंबई व रत्नागिरी येथील शासकीय विद्यालयांमधून अध्यापन केले. हा अध्यापनाचा अनुभव जोशींना १९२२–४७ या काळात मुंबईमध्ये प्रौढांसाठी व औद्योगिक कामगारांकरिता प्रशिक्षणवर्ग चालविण्यास फार उपयोगी पडला.
ना.म. जोशी यांनी कामगारांचे नेते म्हणून कामगारांच्या कल्याणासाठी इ.स. १९११ मध्ये बॉम्बे सोशल सर्व्हिस लीग ही संघटना स्थापन केली. त्यांनी आयुष्यभर कामगारांच्या कल्याणाचेच काम केले. त्यांच्या नेतृत्वात पुढे १९२९ साली AITUC (All India Trade Union Congress)ची स्थापना केली. ते मवाळ नेते होते. नारायण मल्हार जोशी यांनी इ. स.१९११ मध्ये अलाहाबाद येथे ´सामाजिक सेवा समिती `स्थापन केली. सामाजिक प्रश्नाचा अभ्यास व त्यावर चर्चा ही समिती करत असे. रात्रशाळा, ग्रंथालये, औषधालये हे उपक्रम य समितीने राबवले.
नारायण मल्हार जोशी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.