नारळ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

नारळ

माड किंवा श्रीफळ (शास्त्रीय नाव: Cocos nucifera, कोकोस नुसिफेरा ; इंग्लिश: Coconut, कोकोनट ;) हा विषुववृत्तीय व उष्णकटिंबंधीय प्रदेशांत मुख्यत्वे समुद्रकिनारे आणि लगतच्या भागात वाढणारा, ताड कुळातील एक वॄक्ष आहे. याचे फळ नारळ या नावाने ओळखले जाते. सुमारे ३० मीटर उंचीच्या या वृक्षाला ४-६ मीटर लांबीची झावळ्यांच्या स्वरूपातील पाने फुटतात. माडाला, वर्षातल्या दर महिन्यात फुलांचा एक तुरा लागतो. तुऱ्यातील मादी फुलांना लागलेली फळे अकरा ते बारा महिन्यांत पक्व होतात, म्हणजेच प्रत्येक महिन्यात प्रत्येक झाडावरून एक घड काढायला मिळतो. या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा काहीना काही उपयोग आहे, म्हणून या झाडाला कोकणात कल्पवृक्ष मानतात.



ओल्या नारळाला शहाळे असे म्हणतात. याचे पाणी शक्तिवर्धक, थंड व खनिजसंपन्न असते. आजारी, अपचन, जुलाब झालेल्या व्यक्तींना विशेष उपयोगी समजले जाते. शहाळ्यातून निघणाऱ्या पक्व नारळाला शुभ प्रसंगी श्रीफळ म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →