नागपूर-गोवा द्रुतगती मार्ग,किंवा शक्तीपीठ द्रुतगती मार्ग, हा ८०२ कि.मी. लांब, महाराष्ट्रातील तिसरे सर्वात मोठे शहर नागपूर, याला गोवा राज्याशी जोडणारा सरकार कडून मान्यता मिळालेला सहा-पदरी प्रवेश-नियंत्रित द्रुतगतीमार्ग आहे. हा द्रुतगती मार्ग महाराष्ट्रातील ११ आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाणार आहे. हा द्रुतगती मार्गाचा देखभालीची आणि चालविण्याची कामे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ द्वारे केली जाईल. हा मार्ग नागपूर आणि गोव्या दरम्यान प्रवासाची वेळ १८-२० तासांनी कमी करून केवळ ७-८ तासांवर आणि अंतर १,११० किमी वरून ८०२ किमी वर आणेल. हा द्रुतगती मार्ग ८३,६०० कोटी (US$१८.५६ अब्ज) एवढ्या निधीचा खर्चून बांधले जाईल. ही निधी आधी ७५,००० कोटी (US$१६.६५ अब्ज) असल्याचे सांगितले होते. हा मार्ग तीन शक्तीपीठांमधून जाणार असल्याने याला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ येथील १२ ज्योतिर्लिंगांपैकी दोन ज्योतिर्लिंगांसह महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रादेवी, तसेच माहूरमधील रेणुका, तुळजापूरमधील तुळजाभवानी, पूज्य विठोबा मंदिर आणि पंढरपूर, औदुंबर आणि नरसोबावाडी या मार्गावरील श्रद्धास्थळ असतील. हा महाराष्ट्रातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग असेल.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नागपूर–गोवा द्रुतगतीमार्ग
या विषयातील रहस्ये उलगडा.