इमारतींमधील निरनिराळ्या उपयोगांकरिता केलेल्या नळव्यवस्थेसंबंधीचे काम म्हणजे नळकाम होय. अशी नळव्यवस्था सर्वसाधारणपणे रहात्या इमारतीमधून पाणीपुरवठ्याकरिता आणि पावसाचे पाणी व सांडपाणी वाहून नेण्याकरिता असते.
उद्योगधंद्याच्या ठिकाणी रसायने किंवा वायू वाहून नेण्यासाठीसुद्धा विशेष प्रकारची नळव्यवस्था केली जाते. अशा कोणत्याही नळव्यवस्थेत प्रत्यक्ष नळ, त्याला लागणारी जोडसाधने व जोडउपकरणे यांचा समावेश होतो. ज्या कार्यासाठी नळव्यवस्था आयोजित केली असेल ते कार्य व्यवस्थितपणे होत आहे किंवा नाही हे पाहणे व होत नसल्यास त्यात योग्य ती दुरुस्ती करणे, हे नळकऱ्याचे वा नळव्यवस्था योजकाचे काम होय.

नळकाममध्ये पाणी व इतर द्रव पदार्थ वाहून नेण्यासाठी नळ,पाईप्स, वाल्व्ह, टाक्या आणि इतर साहित्य जसे की जोडणीच्या ठीकाणी सॉकेट,L सॉकेट, T सॉकेट वापरली जातात. पिण्यायोग्य पाणीपुरवठा हा नळकामाचा सर्वात सामान्य उपयोग आहे.तसेच पावसाचे पाणी व सांडपाणी वाहून नेण्यासाठी देखील नळकाम केले जाते. कारखान्यांमध्ये वायु,रसायने वाहुन नेण्यासाठी विषेश प्रकारची नळव्यवस्था केलेली असते.नळकाम सुरू करण्यापुर्वी आराखडा कडुन घेतात.नंतर आवश्यक मटेरिअलची यादी करून हे मटेरिअल जमा करून ठेवणे. नळकाम करताना सर्व जोडणी काट्कोनात व सरळ रेषेत केली जाते. नळकामात वापरण्यात येणारे साहित्य व साधने वेगवेगळ्या धातू किंवा पदार्थांपासून बनविलेली असतात. जी.आय.पाईप म्हणजे जस्ताचा थर दिलेला लोखंडी पाइप बांधकाम करताना आत वापरतात.
कास्ट आयर्न म्हणजे ओतीव लोखंडी हे पाईप जास्त लांबीमध्ये मिळतात. जास्त दाब आणि बाह्य भार पेलू शकतात. हे मातीस गंज प्रतिरोधक असतात.
पी.वी.सी. पाईप वजनाने हलके, टिकाऊ आणि सहज हातातून नेता येण्याजोगे असतात.
नळकाम
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?