नलिनी जयवंत (१८ फेब्रुवारी, १९२६:मुंबई, महाराष्ट्र, भारत - २२ डिसेंबर, २०१०:चेंबूर, मुंबई) या एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. बॉलीवूडच्या कृष्ण-धवल काळातील १९४० आणि १९५० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटांत प्रामुख्याने काम केले.
नलिनी जयवंत यांचा जन्म १९२६ मध्ये मुंबई येथे झाला. मराठी/हिंदी चित्रपट अभिनेत्री रतन बाई या नलिनीच्या आत्या होत्या. रतन बाईची मुलगी अभिनेत्री शोभना समर्थ असून, शोभनाच्या मुली नूतन आणि तनुजा या आहेत. इ.स. १९८३ मध्ये त्यांनी नास्तिक या हिंदी चित्रपटात शेवटचे काम केले होते. तेव्हा पासून नलिनी मुख्यतः एकाकी जीवन जगत होत्या.
जयवंत यांचा विवाह १९४५ मध्ये दिग्दर्शक वीरेंद्र देसाई यांच्याशी झाला होता. इ.स. १९४८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी १९६० मध्ये अभिनेते प्रभु दयाल यांच्याशी लग्न केले. या जोडप्याने त्याकाळी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले होते.
नलिनी जयवंत
थोडक्यात पण महत्त्वाचे.