नरगीस दत्त (मूळ नाव: फातिमा रशीद; १ जून, १९२९:कोलकाता - ३ मे, १९८१:मुंबई) या भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. आपल्या तीस वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी आग, मदर इंडिया, आवारा, बरसात, श्री ४२० आणि चोरी चोरी यांसह अनेक यशस्वी चित्रपटांतून अभिनय केला. यांतील अनेक चित्रपटात राज कपूर यांच्याबरोबर त्यांनी काम केले.
हिने बाल कलाकार म्हणून १९३५मध्ये तलाश-ए-इश्क या सिनेमाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, तर अभिनेत्री म्हणून कारकिर्दीस सुरुवात १९४२ साली तमन्ना या चित्रपटाने केली. तेव्हापासून सालापासून ते १९६० च्या दशकापर्यंत वीस वर्षांच्या कारकिर्दीत नर्गीसने अनेक सिनेमांतून कामे केली. त्यातील अनेक चित्रपटांत तिचे नायक सिनेनिर्माता राज कपूर होते.
मदर इंडिया या चित्रपटातील राधाच्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर एक वर्षात या चित्रपटातील आपल्या सहकलाकार सुनील दत्तशी लग्न करून नर्गीस दत्तने चित्रपट अभिनयातून निवृत्ती घेतली. त्यानंतर तिने रात और दिन सारख्या चित्रपटांत अपवादानेच अभिनय केला. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
नर्गीस दत्त
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?