मदर इंडिया हा इ.स. १९५७ साली प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट होता. त्यातल्या आदर्शवादी भूमिकेमुळे चित्रपटाने प्रचंड यश मिळवलेच पण समाजमनावरही छाप ठेवली. याचे दिगदर्शन मेहबूब खान यांनी केले होते. चित्रपटाची कथाही मेहबूब खान यांनी लिहिली होती.
याच कथेवर आधारित औरत नावाचा चित्रपट त्यांनी इ.स. १९४० सालीही बनवला होता. मदर इंडिया हा याच चित्रपटाचा यशस्वी रिमेक होता. यात प्रमुख भूमिकांत नर्गिस , सुनील दत्त, राजेंद्र कुमार, राजकपूर हे होते. चित्रपटाला संगीत नौशाद यांनी दिले होते. तर गाणी लता मंगेशकर , शमशाद बेगम, महम्मद रफी, मन्ना डे यांनी गायली होती.
हा चित्रपट भारतातर्फे ऑस्कर अॅकॅडमी पुरस्काराच्या विदेशी भाषा विभागासाठी पाठवण्यात आला होता. तो पुरस्कार हुकला असला तरी, ऑस्कर नामांकन मिळवणारा तो पहिला भारतीय चित्रपट होता.
मदर इंडिया
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?