नरिंदर सिंह कपानी (३१ ऑक्टोबर १९२६ - ४ डिसेंबर २०२०) हे एक भारतीय-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि फायबर ऑप्टिक्स क्षेत्रातील अग्रणी होते. विशेष म्हणजे, कपानी हे "फायबर ऑप्टिक्स" ही संज्ञा तयार करण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या नोबेल पारितोषिक -योग्य शोधासाठी फॉर्च्यून मासिकाने त्यांना २० व्या शतकातील सात "अनामिक नायकांपैकी" एक म्हणून नाव दिले. त्यांना २०२१ मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मविभूषण, मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यांनी भारतीय आयुध कारखाना सेवेत (IOFS) अधिकारी म्हणून सेवा बजावली होती. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना भारताच्या संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार पदही देऊ केले होते. ते शीख फाउंडेशनशी देखील संबंधित होते आणि संग्राहक म्हणून शीख कलाकृतींच्या जतन कार्यात सहभागी होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नरिंदर सिंह कपानी
यामागील विज्ञान आणि इतिहास.