ध्यानचंद पुरस्कार, अधिकृतपणे क्रीडा व खेळांमधील ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा खेळ जगतातील आजीवन कर्तृत्वासाठीचा भारतीय सरकार तर्फे देण्यात येणारा पुरस्कार आहे. १९२६ ते १९४८ या काळातील २० वर्षांपेक्षा जास्त कारकिर्दीत १००० पेक्षा अधिक गोल नोंदविणाऱ्या भारतीय हॉकीपटू ध्यानचंद (१९०५-७९) यांच्या नावावर हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा दरवर्षी क्रीडा व युवा मंत्रालयाद्वारे सादर केला जातो.
पहिला पुरस्कार हा २००२ साली देण्यात आला होता. ह्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी होते शाहूराज बिराजदार (मुष्टियुद्ध), अशोक दिवाण (हॉकी) आणि अपर्णा घोष (बास्केटबॉल). दरवर्षी हा पुरस्कार ३ ते ५ खेळाडूंना देण्यात आला आहे.
ध्यानचंद पुरस्कार
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.