डॉ. दत्तात्रेय नारायण धनागरे (इ.स. १९३६:वाशीम, महाराष्ट्र - ७ मार्च, इ.स. २०१७) हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते.
धनागरे यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथे झाले. अमेरिकेतील एमआयटी या संस्थेतून त्यांनी समाजशास्त्रातील उच्च पदवी घेतली. त्यानंतर आग्रा विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे त्यांनी कानपूरच्या आयआयटीत अध्यापन कार्य केले. त्यानंतर ते पुणे विद्यापीठात रुजू झाले. त्यांनतर ते शिवाजी विद्यापीठचे कुलगुरू झाले. भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) सदस्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. इंडियन सोशिओलॉजिकल सोसायटीच्या जीवनगौरव पुरस्कारसह अन्य काही संस्थांचे जीवनगौरव तसेच अन्य पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मुंबईतील एशियाटिक सोसायटीचे ते विश्वस्त होते.
तत्त्वज्ञान आणि मानववंशशास्त्र अशा दोन्हींच्या ऐतिहासिक संदर्भामधून भारतात समाजशास्त्रीय विद्याशाखेची रचना झाली आणि त्यामध्ये मूलभूत संशोधन करणाऱ्यांपैकी डॉ. धनागरे हे एक होत.
त्यांचे वडील वाशीम येथे वकील होते.
द.ना. धनागरे
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?