द्विनोंदी पद्धत (वाणिज्य)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

आधुनिक पुस्तपालनाच्या संकेताप्रमाणे द्विनोंदी पद्धतीने लेखा लिहिले जातात. ही पद्धती सर्वप्रथम भारतात शोधली गेली. ग्रीक आणि रोमन साम्राज्यापूर्वी भारतात त्याचे अस्तित्त्व असल्याचे पुरावे आहेत. इटलीमधील व्यापारी गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ असणारा ल्युका डी बर्गो पासीअलो यांच्याकडे १४९४ मध्ये द्विनोंदी पद्धत विकसित करण्याचे श्रेय जाते. लिओनार्डो दा विन्चीचा वर्गमित्र असणाऱ्या लुका ने आपल्या "समा डी अरीथमेटिका" या १४९४ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात या पद्धतीची माहिती दिली आहे.

कुठल्याही व्यवहाराला किमान दोन बाजू असतात या साध्या तत्त्वावर द्विनोंदी पद्धत आधारित आहे. प्रत्येक व्यवहारात किमान दोन लेखे अंतर्भूत असतात. देणारा आणि घेणारा, संपत्ती किंवा देयता, उत्पन्न किंवा खर्च या प्रकारच्या लेख्यांमधेच एखादा व्यवहार होत असतो. जेव्हा एखाद्या लेख्यात जमा होते तेव्हा दुसऱ्या लेख्यात तेवढीच रक्कम नावे होते.

लेखापुस्तकात व्यवहाराची नोंद एका खात्यास नावे करणे आणि दुसऱ्यास जमा करणे म्हणजेच द्विनोंदी पद्धत होय.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →