दोमेनिको दि तोम्मासो कुर्रादी दि दोफ्फो बिगोर्दी तथा दोमेनिको घिर्लांदैयो(२ जून, १४४८ - ११ जानेवारी, १४९४) हा १५व्या शतकातील इटलीमधील फिरेंझे येथील चित्रकार होता. याची कारकीर्द इटलीतील रिनैसाँ काळात होती. हा व्हेरोक्कियो, पोलैओलो बंधू आणि सांद्रो बॉत्तिचेली यांचा समकालीन होता.
घिर्लांदैयो एका मोठ्या आणि प्रसिद्ध कार्यशाळेचा प्रमुख होता. यांत त्याचा भाऊ भाऊ दाव्हिदे घिर्लांदैयो आणि बेनेदेत्तो घिर्लांदैयो, सान गिमिन्यानो येथील त्यांचा मेहुणा बास्तियानो मैनार्दी आणि नंतर त्याचा मुलगा रिदोल्फो घिर्लांदैयो यांनी काम केले. या कार्यशाळेतून मिकेलेंजेलोसह अनेक उमेदवार उत्तीर्ण झाले.
धार्मिक कथांच्या संदर्भात समकालीन जीवनाचे चित्रण आणि समकालीन लोकांना त्या चित्रांतून दाखवणे ही घिर्लांदैयोची विशेषता होती. यामुळे तो अधिक प्रसिद्ध झाला आणि त्याला अनेक मोठी कामे मिळाली.
दोमेनिको घिर्लांदैयो
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!