दॉन नदी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

दॉन नदी

दॉन (रशियन: Днепр) ही पश्चिम रशियामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी तुला ओब्लास्तमधील नोवोमोस्कोव्स्क ह्या शहरात उगम पावते. तेथून दक्षिणेस सुमारे १,८७० किमी लांब वाहत जाऊन ती अझोवच्या समुद्राला मिळते. वोरोनेझ व रोस्तोव दॉन ही दॉन नदीवरील मोठी शहरे आहेत. १०२ किमी लांबीच्या कृत्रिम कालव्याद्वारे दॉन नदी वोल्गा नदीसोबत जोडली गेली असून मालवाहतूकीसाठी ती रशियाच्या महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एक आहे.

दॉन नदी रशियाच्या खालील ओब्लास्तांमधून वाहते.



तुला ओब्लास्त

वोरोनेझ ओब्लास्त

लिपेत्स्क ओब्लास्त

वोल्गोग्राद ओब्लास्त

रोस्तोव ओब्लास्त

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →