देहदान

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

प्राचीन परंपरेत देहदान ही संकल्पना प्रचलित नाही त्यामुळे ती शास्त्र दृष्ट्या संमत नाही असे मानले जाते. दाहकर्म संस्कारात देहामध्ये काही अपूर्णता असेल तर दिवंगताला सद्गती मिळत नाही अशी समजूत प्रचलित आहे, त्यामुळे देहदान करण्यास लोक उत्सुक दिसत नाहीत. तथापि गीतेत कृष्णाने सांगितले आहे की प्रत्येक माणूस त्याच्या जीवंतपणी जी कृत्ये करतो त्यानुसार त्याला पुढील गती प्राप्त होते.रक्तदान, नेत्रदान, अवयवदान ही विसाव्या शतकातील अत्यात पुण्यकारक दाने होत.या दानांमुळे कोणाला दृष्टी मिळते तर कोणा अत्यावस्थास जीवनदान मिळते. अशा प्रकारचे दान करण्याची सोय आता विज्ञानाच्या प्रगतीमुळे झाली आहे. नरदेहाच्या सूक्ष्म अभ्यासासाठी उपयोगी ठरते देहदान!

देहदान केल्यानंतर श्राद्धविधीही अवश्य करावा. श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम् | जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय, त्यामुळे निधन पावलेल्या व्यक्तीबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देहदान केले असले तरी श्राद्ध अवश्य करावे.

राजा हर्षवर्धन आपली संपत्ती गरजूना देत असे. राजा दिलीपाने आपला देहच सिंहाच्या भुकेसाठी दिला होता. शिबी राजाने कबुतराच्या प्राणासाठी आपला देह देवू केला. अशी आपली प्राचीन दानपरंपरा.या परंपरेत विनोबांनी भूदान, श्रमदान याची भर घालून कालोचित दान प्रकारांची ग्वाहीच दिली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →