गुरू पौर्णिमा हा भारतीय परंपरेत एक विशेष दिवस मानला जातो.आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते.गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मीयांद्वारे साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा ही पारंपारिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते.गुरू पूजन करण्यासाठी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।। या पारंपरिक श्लोकाचा उच्चार करण्याची पद्धती प्रचलित आहे. याच दिवसाला व्यास पौर्णिमा असेही संबोधिले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गुरुपौर्णिमा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.