दृष्टी रेषा, ज्याला दृष्टी अक्ष किंवा दृष्टीरेषा ( दृश्य रेखा देखील) म्हणून ओळखली जाते, ही पाहणारा / निरीक्षक / प्रेक्षक याचा डोळा आणि स्वारस्य असलेली वस्तू किंवा तीची सापेक्ष दिशा यांच्यातील एक काल्पनिक रेषा आहे. अशी निरिक्षकाला स्वारस्य असणारी किंवा असू शकणारी परिभाषित करण्यायोग्य वस्तू दृष्यमान असण्याच्या किमान अंतरापेक्षा जास्त अंतरावर असावी. प्रकाश शास्त्रात , भिंगाच्या वापरामुळे किरणांचे अपवर्तन होऊ शकते व वस्तू विकृत भासते. सावल्या आणि हालचाल देखील दृष्टीरेषेच्या आपल्या समजावर प्रभाव टाकू शकतात ( मृग जळातील प्रकाशाच्या भ्रमाप्रमाणे ).
दृष्टीरेषा यातील "रेषा" या शब्दामुळे असे ध्वनित होते की ज्या किरणाद्वारे निरीक्षण केलेली वस्तू दिसते तो किरण सरळ रेषेत प्रवास करते. पण अनेकदा असे नसते. उदाहरणार्थ ते किरण वक्र/कोणीय मार्ग घेऊ शकते जर ते आरशातून परावर्तित होत असेल, भिंगातून प्रवास करण्याने त्याचे आपवर्तन होत असेल, ज्या माध्यमातून ते प्रवास करीत असेल त्याची घनता बदलत असेल किंवा गुरुत्वाकर्षणामुळे विचलित असेल. अभ्यास करताना विशिष्ट लक्ष्ये असतात, जसे की जलपर्यटनात जहाजांचे दिशादर्शन, खूण पताका किंवा सर्वेक्षणातील नैसर्गिक वैशिष्ट्ये, खगोलशास्त्रातील खगोलीय वस्तू इत्यादी. निरीक्षणात इष्टतम परिणाम मिळविण्यासाठी, पूर्णपणे अडथळा विरहित दृष्टीरेषा असणे श्रेयस्कर आहे.
दृष्टीरेषा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.