दृश्यम: द कन्क्लूजन (अथवा दृश्यम ३) हा २०२६ मधील एक भारतीय हिंदी भाषिक गुन्हेगारी थरारपट आहे. या चित्रपटाचे सह-लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. पॅनोरमा स्टुडिओ आणि स्टार स्टुडिओ१८ द्वारे निर्मित हा चित्रपट दृश्यम २ (२०२२) चा पुढील भाग, तर दृश्यम चित्रपट मालिकेचा तिसरा भाग आहे. या चित्रपटाचा अंत स्वतंत्र लिखित असून ती मूळ मल्याळम चित्रपटाच्या कथानकाशी जोडलेला नाही.
या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, जयदीप अहलावत, रजत कपूर, प्रकाश राज, इशिता दत्ता आणि मृणाल जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत.
चित्रपटाचे प्रमुख चित्रीकरण डिसेंबर २०२५ ते जून २०२६ दरम्यान प्रामुख्याने मुंबई आणि गोवा येथे पार पडले. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक पुनरावलोकने (रिव्ह्यू) मिळाली आहेत. सध्या हा २०२६ मधील ५ वा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे.
दृश्यम: द कन्क्लूजन
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.