दुबई संग्रहालय

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

दुबई संग्रहालय

दुबई संग्रहालय (अरबी: متحف دبي) हे दुबई संयुक्त अरब एमिरेट मधील मुख्य संग्रहालय आहे जे अल फहीदी किल्ल्यामध्ये आहे. हे संग्रहालय १७८७ मध्ये बांधले गेले आहे आणि ही दुबईमधील सर्वात जुनी इमारत आहे. दुबईच्या शासकांनी दुबईच्या अमिरातमध्ये पारंपारिक जीवनशैली सादर करण्याच्या उद्देशाने १९७१ मध्ये हे संग्रहालय दुबईच्या राज्यकर्त्याने उघडले होते. किल्ल्यापासून, गॅलरीकडे जाण्याचा मार्ग आहे, जी विशेषत १८०० च्या दशकात देशाची सामान्य संस्कृती दर्शविते. या गॅलरीमध्ये पुरातन वस्तू तसेच दुबईबरोबर व्यापार करणाऱ्या आफ्रिकन व आशियाई देशातील कलाकृतींचा समावेश आहे. दुबई संग्रहालयाचे एकूण क्षेत्रफळ ४००० चौरस मीटर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →