दीप्ती भगवान शर्मा (२४ ऑगस्ट, १९९७:सहारनपूर, उत्तर प्रदेश, भारत - ) ह्या भारतीय महिला क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहेत. त्या अष्टपैलू आहेत. त्या डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हातानी ऑफ ब्रेक गोलंदाजी करतात आणि सध्या (२०२० मध्ये) क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहेत आणि त्या सध्या एक दिवसीय सामना खेळणाऱ्या महिलांमध्ये त्यांच्या सर्वोच्च वैयक्तिक धावांसाठी तिसऱ्या क्रमांकावर आहेत (१८८ धावा). दीप्ती शर्माने पूनम राऊत हिच्या साथीने ३२० धावांचा सर्वोच्च त्रिशतकी भागीदारीचा विक्रम रचला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दीप्ती शर्मा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?