दिल्लीचा मुख्यमंत्री हा भारताच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशाचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार केवळ दिल्ली व पुडुचेरी ह्या दोन केंद्रशासित प्रदेशांनाच स्वतःचे सरकार बनवण्याची संमती आहे. भारताच्या राज्यांमध्ये राज्यप्रमुख राज्यपाल असतो परंतु दिल्ली व पुडुचेरीमध्ये राज्यपाल हे पद अस्तित्वात नसून उपराज्यपालाची निवड भारताचे राष्ट्रपती करतात. परंतु दिल्लीची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला उपराज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो. १९५२ सालापासून आजवर ८ व्यक्ती दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या ९व्या विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.