आसामचे मुख्यमंत्री

थोडक्यात पण महत्त्वाचे.

आसामचे मुख्यमंत्री

आसामचा मुख्यमंत्री हा भारताच्या आसाम राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. आसाम विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

१९४६ सालापासून आजवर १५ व्यक्ती आसामच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत. २०१६ सालच्या निवडणुकीत प्रथमच बहुमत मिळालेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते सर्बानंद सोनोवाल हे भाजपचे आसाममधील पहिले मुख्यमंत्री होते. मे २०२१ पासून भाजपचे हिमंता बिस्वा सरमा मुख्यमंत्रीपदावर आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →