गोव्याचा मुख्यमंत्री हा भारताच्या गोवा राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.
१९६१ साली भारताने पोर्तुगीज गोव्यावर लष्करी आक्रमण करून गोवा आपल्या अधिपत्याखाली आणला. १९६१ ते १९८७ दरम्यान गोवा, दमण व दीव हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश होता. गोव्याला १९८७ साली संपूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त झाला व दमण आणि दीव हा केंद्रशासित प्रदेश राहिला. १९६३ सालापासून आजवर ११ व्यक्ती गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री
या विषयावर तज्ञ बना.