दिया मिर्झा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

दिया मिर्झा

दिया मिर्झा-हेंड्रिच ( ९ डिसेंबर १९८१) ही एक भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री व निर्माती आहे. हैदराबाद येथे जन्मलेल्या दियाने कॉलेज शिक्षण चालू असतानाच मॉडेलिंगला सुरुवात केली. २००० सालच्या फेमिना मिस इंडिया सौंदर्यस्पर्धेत दियाने तिसरे स्थान मिळवले. भारतातर्फे २००० मिस आशिया पॅसिफिक स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या दियाने ही स्पर्धा जिंकली. ह्याच वर्षी प्रियांका चोप्राने मिस वर्ल्ड तर लारा दत्ताने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकल्या होत्या.

२००१ साली दियाने रहना है तेरे दिल में ह्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून अनेक लहान-मोठ्या भूमिका तिने केल्या आहेत.

दिया मिर्झाचा पहिला विवाह तिचा व्यावसायिक भागीदार साहिल संघा सोबत ऑक्टोबर २०१४ मध्ये आर्य समाज पद्धतीने झाला..



इ. स. २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आणि १५ फेब्रुवारी २०२१ रोजी व्यावसायिक वैभव रेखी सोबत दिया मिर्झा दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकली

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →