दिया कुमारी (जन्म ३० जानेवारी १९७१) ह्या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहे. त्या १५ डिसेंबर २०२३ पासून भजन लाल शर्मा यांच्या मंत्रालयात प्रेमचंद बैरवा यांच्यासमवेत राजस्थानच्या ६व्या उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहे. त्या १६ व्या राजस्थान विधानसभेत आमदार म्हणून विद्याधर नगरचे प्रतिनिधित्व करतात. त्या जयपूर राज्याच्या पूर्वीच्या राजघराण्यातील सदस्य आहे.
२०१९ ते २०२३ दरम्यान त्या राजसमंद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या सदस्य होत्या.
कुमारी ह्या भारतातील ब्रिटिश राजवटीत जयपूर संस्थानातील शेवटचे शासक महाराजा सवई मानसिंग (द्वितीय) यांच्या नाती आहेत.
दिया कुमारी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.