दार्दी भाषासमूह ( दार्दू ), हे उत्तर पाकिस्तान, वायव्य भारत आणि ईशान्य अफगाणिस्तानच्या काही भागांमध्ये बोलल्या जाणाऱ्या अनेक हिंद-आर्य भाषांचा समूह आहे. या प्रदेशाला कधीकधी दार्दिस्तान असेही म्हटल्या जाते.
जवळच्या भाषिक किंवा वांशिक नात्यांऐवजी, दार्दी हे नाव एक भौगोलिक संकल्पना आहे, जी हिंद-आर्य भाषांच्या वायव्येकडील गटाला सूचित करते. या भाषा बोलणाऱ्यांमध्ये वांशिक ऐक्य नाही, तसेच या भाषांचा उगम एकाच पूर्वजापासून होत नाही.
गांधारमध्ये वापरलेली लुप्त झालेली गांधारी भाषा ही दार्दी स्वरूपाची होती. भाषिक पुराव्यांनी गांधारी भाषेला काही जिवंत दार्दी भाषांशी, विशेषतः तूरवाली आणि इतर काही कोहिस्तानी भाषांशी जोडल्या जाते.
दार्दी भाषासमूह
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?