नुरिस्तानी भाषा, ज्यांना आधी काफिरी भाषा म्हणून ओळखले जात होते, या हिंद-आर्य, दार्दी आणि इराणी भाषांसोबत हिंद-इराणी भाषा कुटुंबातील चार गटांपैकी एक आहेत. या भाषा बोलणारे अंदाजे २,१४,००० लोक आहेत, जे प्रामुख्याने ईशान्य अफगाणिस्तानातील नुरिस्तान आणि कुनर प्रांतांमध्ये आणि पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वाच्या चित्राल जिल्ह्यातील काही लगतच्या खोऱ्यांमध्ये राहतात. नुरिस्तानी लोकांचा प्रदेश दक्षिण हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे व पश्चिमेला आलींगार नदी, मध्यभागी पेच नदी आणि पूर्वेला बाश्गल आणि चित्राल नद्या या प्रदेशातून वाहतात. अधिक व्यापकपणे सांगायचे झाल्यास, नुरिस्तान प्रदेश भारतीय उपखंड आणि इराणी पठाराच्या उत्तरेकडील छेदनबिंदूवर वसलेला आहे.
१९व्या शतकापर्यंत नुरिस्तानी भाषांचे साहित्यात वर्णन केले गेले नव्हते. तेथील रहिवाशांच्या इस्लामाच्या आदले धार्मिक प्रथांमुळे या प्रदेशाचे जुने नाव 'काफिरिस्तान'(विधमी-प्रदेश) होते, परंतु या प्रदेशातील रहिवाशांनी इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर आधीचे नाव सोडून 'नुरिस्तान' ('प्रकाशाची भूमी') असे नाव ठेवले.
नुरिस्तानी भाषा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.