दादू चौगुले (१९४६ – २० ऑक्टोबर २०१९) हे कोल्हापूर येथील एक नामवंत भारतीय कुस्तीगीर होते. त्यांनी दोन वेळा महाराष्ट्र केसरी हा प्रतिष्ठेचा किताब जिंकला होता, तसेच त्यांना रुस्तम-ए-हिंद आणि महा भारत केसरी हे किताबही देण्यात आले होते.
ते भारताच्यावतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले होते आणि ९७४ मधील ब्रिटिश राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये न्यू झीलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत जडवजन गटात रौप्य पदक मिळवले होते. २०१८ मध्ये भारत सरकारने त्यांना ध्यानचंद पुरस्कार देऊन गौरवले.
२० ऑक्टोबर २०१९ रोजी कोल्हापूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय ७३ होते.
त्यांनी कोल्हापूरमधील मोतीबाग तालिम या कुस्ती प्रशिक्षण केंद्रात गणपतराव आंदळकर आणि बाळू बिरें यांच्यासारख्या नामवंत कुस्तीपटूंच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक भारतीय कुस्तीचे प्रशिक्षण घेतले होते.
दादू चौगुले
थोडक्यात पण महत्त्वाचे.