दादाजी खोब्रागडे

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

दादाजी खोब्रागडे

दादाजी रामाजी खोब्रागडे (जन्म:नागभीड, मृत्यू:३ जून, २०१८; चंद्रपूर) हे भाताच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जाती शोधून काढणारे एक कृषी संशोधक होते.

केवळ इयत्ता तिसरीपर्यंत शिकलेले खोब्रागडे एक अल्पभूधारक शेतकरी होते. १९८३ पासून त्यांनी तांदळाचे नवीन वाण बनवण्याच्या प्रयोगाला सुरुवात केली. सहा वर्षांच्या बीजगुणनाच्या प्रयोगानंतर ते नवीन वाण तयार करण्यात यशस्वी झाले. या वाणाला काय नाव द्यायचे, हे न सुचल्यामुळे त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या एच.एम.टी. कंपनीच्या एच.एम.टी.सोना घड्याळावरून तेच नाव या वाणाला दिले. पुढे कृषी विद्यापीठाने त्यांना श्रेय न देता हे वाण बाजारात आणले.

खोब्रागडे यांनी केलेल्या संशोधनाच्या जोरावर अनेक बियाणे कंपन्यांनी पैसे मिळवले. ते मात्र हलाखीचे जीवन जगत राहिले.

त्यांच्या अखेरच्या आजारपणात शेतकऱ्यांनी पैसे गोळा करून उपचाराचा खर्च केला. डॉ.अभय बंग यांनी शोधग्राममध्ये उपचारांची सोय केली. इथेच खोब्रागडे यांचा मृत्यू झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →