दशावतार

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

दशावतार

दशावतार हे विष्णूने १० वेळा घेतलेले आहेत.

हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीपालन करणारा मानले गेले आहे. धर्माच्या रक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवतपुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख अवतार 'दशावतार' स्वरूपात प्रसिद्ध आहेत.

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये म्हणतात

यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥



संदर्भित अन्वयार्थ

भारत = हे भारता(भरतवंशी अर्जुना), यदा यदा = जेव्हा जेव्हा, धर्मस्य = धर्माची, ग्लानिः = हानि, (च) = आणि, अधर्मस्य = अधर्माची, अभ्युत्थानम्‌ = वृद्धी, भवति = होते, तदा हि = तेव्हा तेव्हा, अहम्‌ = मी, आत्मानम्‌ = आपले रूप, सृजामि = रचतो म्हणजे साकाररूपाने लोकांच्या समोर प्रकट होतो ॥ ४-७ ॥

(अर्थ- हे भारता(भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो.)

परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्‌ ।

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

साधूनाम्‌ = साधूंचा म्हणजे चांगल्या मनुष्यांचा, परित्राणाय = उद्धार करण्यासाठी, दुष्कृताम्‌ = पापकर्म करणाऱ्यांचा, विनाशाय = विनाश करण्यासाठी, च = आणि, धर्मसंस्थापनार्थाय = धर्माची चांगल्या प्रकारे स्थापना करण्यासाठी, युगे युगे = युगायुगात, सम्भवामि = मी प्रकट होतो ॥ ४-८ ॥

(अर्थ- सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो.)

अर्थात : हे अर्जुना (हे भारता), जेव्हा जेव्हा धर्माची हानी येते, आणि अधर्माची वाद होते, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्म संस्थापिण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो.

मत्स्यः कूर्मो वराहश्च नरसिंहश्च वामनः रामो रामश्च रामश्च कृष्ण: कल्किच ते दश।

मासा ,कासव , वराह, मानवी सिंह, वामन (बटू ब्राह्मण), परशुराम, दशराथी राम, बलराम,आणि कल्की ते दहा.

-सॅन्टकम प्रवेशद्वार, आदिवराह गुफा (7 वे शतक), महाबलीपुरम;

श्री देवविष्णू एकूण दहा अवतार असल्याचे मानले जाते. ते दहा अवतार पुढील प्रमाणे आहेत.



मत्स्य

कूर्म

वराह

नरसिंह

वामन (बटू ब्राह्मण) दक्षिण भारतात उपेन्द्र नावाने ओळखले जाते.

परशुराम

राम

कृष्ण

गौतम बुद्ध

कल्की

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →