कल्की

थोडक्यात पण महत्त्वाचे.

कल्की

कल्की अवतार (संस्कृत: कल्कि अवतार; IAST: Kalkī Āvatār) हा हिंदू धर्मातील देवता विष्णूचा दशावतारापैकी १० वा अवतार आणि भविष्यातील अवतार मानला जातो. वैष्णव ब्रह्मांडशास्त्रानुसार, हा अंतहीन चक्र असलेल्या चार कालखंडापैकी शेवटचा असून कलियुगाच्या अंतानंतर येणारा हिंदू देव विष्णूचा दहावा अवतार आहे. जेव्हा कल्की देवदत्त नावाचा शुभ्र घोड्यावर स्वार होऊन, तेजस्वी तलवारांनी सर्व पापी अधर्म दुष्ट लोकांचा विनाश करेल तेव्हा सतयुग प्रारंभ होईल. पौराणिक कथांनुसार, कलियुगात पाप वाढल्यावर, जगातील अंधार व अधर्म, दुष्टांचा नाश करण्यासाठी, धर्म स्थापना करण्यासाठी कल्की अवतार प्रकट होईल. कलियुगात कलि राक्षसाचा विनाश करेल. कल्की अवताराला "निष्कलंक भगवान "या नावाने देखील ओळखला जाईल. हा अवतार ६४ कलांनी पूर्ण असलेला निष्कलंक अवतार आहे.कलियुगाच्या अगदी शेवटी प्रकट होईल असे भाकीत केले आहे.

कल्की हा अवतार कलियुग व सतयुगच्या संधिकालामध्ये होईल. सर्वप्रथम महाप्रलय येऊन कलियुगाच्या अंतानंतर सत्ययुग (सतयुग) सुरू होईल. कलियुगाचा कालावधी ४,३२,००० वर्षे आहे, विद्वानांच्या संशोधनानुसार, इसवी सन पू्र्व ३,१०२ या वर्षी कलियुग सुरू झाले. त्याच्या पौराणिक कथांची तुलना इतर धर्मातील मशीहा, कयामत, फ्रैशोकरेटी (फारशी) आणि मैत्रेय संकल्पनेशी केली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →